Advertisement

डेंग्यूचा कहर सुरूच, मुंबईत डेंग्यूचा पाचवा बळी


डेंग्यूचा कहर सुरूच, मुंबईत डेंग्यूचा पाचवा बळी
SHARES

मुंबई - डेंग्यू-चिकुनगुनियाचा ताप काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे. पालिका प्रशासनाकडून डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियावर नियंत्रण आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र रूग्णांची संख्या वाढतच आहे. पालिकेच्या आरोग्य खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या आकडेवारीनुसार डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा ताप कायम असल्याचं स्पष्ट झालंय.
ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 228 रुग्ण तर 4हजार 98 संशयित रुग्ण आढळले आहे. तर चिकुनगुनियाचे 10 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे ऑक्टोबरमध्ये मुंबईत डेंग्यूचा पाचवा बळी गेला आहे. साकीनाका येथील 20 वर्षीय तरुणीचा केईएम रुग्णालयात 17 ऑक्टोबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही तरुणी जळगावमध्ये शिक्षण घेत होती. तिची तब्येत बिघडल्यानं ती आपल्या साकीनाक्यातील घरी आली असता तिला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते.
ऑक्टोबरमधील रुग्णांची आकडेवारी
ताप - 14156
मलेरिया - 577
डेंग्यू - 228
संशयित डेंग्य - 4098
चिकूनगुनिया - 10
संशयित चिकुनगुनिया - 47
लेप्टो - 33
संशयित लेप्टो - 239

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा