Advertisement

११ दिवसांत डेंग्यूचे १०२, मलेरियाचे २१७ रुग्ण


११ दिवसांत डेंग्यूचे १०२, मलेरियाचे २१७ रुग्ण
SHARES

पाऊस सुरू झाला की, त्याच्या पाठोपाठ आजारही आपसूकच येतात. त्यात सर्वात जास्त पसरतात साथीचे आजार. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू या आजारांना तर आयतं निमंत्रण मिळतं. २९ ऑगस्टला पडलेल्या पावसानंतर डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात केवळ ११ दिवसांत डेंग्यूचे १०२ रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते ऑगस्ट या ८ महिन्यांत डेंग्यूचे २९३ रुग्ण आढळून आले होते. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता.

ऊन, सावली, त्यात मध्येच वाढलेला उकाडा यामुळे आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपोआपच कमी होते. त्यात यावर्षी वातावरणाच्या आर्द्रतेतही बरेच बदल झाले आहेत. २९ ऑगस्टच्या पावसानं तर मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यात अनेक जण दूषित पाण्यातून वाट काढत आपाफल्या घरी गेले. त्यातूनच बरेच आजार उद्भवतील अशी भीती महापालिकेच्या आरोग्य विभागालाही मोठ्या प्रमाणात होती.


मलेरियाच्या रुग्णांमध्येही वाढ

डेंग्यूसोबत मलेरियाच्या रुग्णांमध्येही बरीच वाढ झाली आहे. सप्टेंबरच्या ११ दिवसांत मलेरियाचे २१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर, जानेवारी ते ऑगस्ट १०४८ मलेरियाचे रुग्ण आढळून आले होते आणि एकाचा मृत्यू झाला होता. पण फक्त ११ दिवसांत २१७ एवढे रुग्ण आढळून येणं ही खरंच चिंतेची बाब आहे.

तसंच, डेंग्यू, मलेरियासोबत सप्टेंबर महिन्याच्या ११ दिवसांत लेप्टोचे २४, स्वाईन फ्लूचे २०, गॅस्ट्रोचे २००, हेपेटायटिसचे ५० आणि कॉलराचा १ रुग्ण आढळून आला आहे. या आजारांवर वेळीच उपाययोजना न केल्यास रुग्णसंख्या आणखी वाढू शकते.


डेंग्यूची लक्षणे –

  • अचानक ताप येणे
  • डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी
  • उलट्या होणे
  • त्वचेवर चट्टे उठणे किंवा ओरखडे उठणे
  • डोळ्यांची जळजळ होणे
  • रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होणे



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा