मुंबईकरांना डेंग्यूचा 'ताप'

 Pali Hill
मुंबईकरांना डेंग्यूचा 'ताप'

मुंबई - सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये दरवर्षी वातावरणातील बदलामुळे डेंग्यूची साथ डोकं वर काढते. त्यानुसार यंदाही मुंबईकरांना डेंग्यूचा ताप सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी प्रत्येक विभागात जाऊन डेंग्यूच्या अळ्या शोधून त्या नष्ट करण्याचे काम करत आहे. आरोग्य विभागाने अधिकृतपणे 13 हजारांहून अधिक ठिकाणांहून डेंग्यूच्या अळ्या शोधून काढल्या असून गेल्या दोन आठवड्यात 122 डेंग्यूचे रूग्ण आढळल्याचे सांगितले जात आहे. हा आकडा अधिक वाढण्याचीही शक्यता आहे. आठवड्याभरात डेंग्यूचे दीड हजारांहून अधिक संशयित रूग्ण आढळले आहेत..

डेंग्युवर नियंत्रणासाठी पालिकेची सोय

पालिका रूग्णालयांमध्ये 2 हजार बेडची सोय

रूग्णांना मोफत उपचाराची सोय

सर्वात जास्त डेंग्युच्या अळ्या सापडलेली ठिकाणे

अंधेरी पूर्व के विभाग (884)

एल्फिन्स्टन जी दक्षिण विभाग (797)

भायखळा ई विभाग (789)

डेंग्यूची लक्षणे

अचानक ताप येणे

डोकेदुखी, सांधेदुखी किंवा पाठदुखी

उलट्या होणे

त्वचेवर चट्टे उठणे किंवा ओरखडे उठणे

डोळ्यांची जळजळ होणे

रक्तातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होणे

या गोष्टी पाळा, डेंग्यू टाळा

ड्रम, टाक्यांमध्ये आठ दिवसांवर पाणी साठवून ठेऊ नका

एसी, फ्रीज नियमित स्वच्छ करा

मनी प्लांट, फ्लाॅवर पाॅटमधील पाणी नियमितपणे बदला

जुने टायर, थर्माकोल, भंगार त्वरीत घरातून काढून टाका

खिडक्यांना जाळ्या बसवा

ताप आल्याबरोबर त्वरीत डाॅक्टरांकडे जा

ताप कमी होत नसल्यास त्वरीत रक्त चाचणी करा

Loading Comments