Advertisement

मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ


मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ
SHARES

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे सध्या हिवतापाच्या रुग्णांमध्येही बरीच वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जून आणि जुलै महिन्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. यावर्षीच्या जून आणि जुलै महिन्यात हिवतापाचे सर्वाधिक 1194 रुग्ण आढळून आले आहेत. तसंच आतापर्यंत हिवतापामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.


पालिकेची कीटक नियंत्रण मोहीम

या आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या मासिक आढावा बैठकीत जुन्या गिरण्या आणि बंद अवस्थेतील इमारत परिसरात कीटक नियंत्रण करण्यासाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक करण्याचा ठराव करण्यात आला.

पाऊस पडला की ठिकठिकाणी पाणी साचते. त्या पाण्यात डेंग्यू आणि हिवतापाच्या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो. जानेवारी ते जुलै या महिन्यात 1194 हिवतापाचे रुग्ण आढळून आले असून यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, जुलै महिन्यात डेंग्यूचे 70 रुग्ण आढळून आले असून, गेल्या 7 महिन्यात डेंग्यूच्या 200 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हिवताप आणि डेंग्यू या आजारांचा प्रसार अॅनोफिलीस आणि एडिस इजिप्ती या डासांमुळे होतो. या डासांची पैदास साचलेल्या पाण्यात होते.


कावीळ झाल्याने गर्भवतीचा मृत्यू

कुर्ल्यातील 25 वर्षीय गर्भवती महिलेचा कावीळ या आजाराची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला. ती सात महिन्यांची गर्भवती होती. ती खासगी रुग्णालयात उपचार घेत होती. रक्त तपासणीत कावीळ आजाराचे निदान झाल्यानंतर पुढील 5 दिवसांत तिचा मृत्यू झाला.


तर दूषित पाण्यातून काविळीचा संसर्ग

दूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ आणि कॉलरा या आजारांचा फैलाव वाढत असून मुंबईकरांनी फूटपाथवरील पदार्थ खाऊ नयेत आणि पाणी उकळून प्यावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. जुलै महिन्यात 1,010 अतिसाराच्या रुग्णांची नोंद झाली असून कावीळचे 134 रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारी ते जुलै या काळात 637 काविळीचे रुग्ण आढळले आहेत.



हेही वाचा

मुंबईकरांचा पावसाळा आजारात जाणार, डेंग्यु-मलेरियाच्या अळ्या झाल्या दुप्पट!


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा