Advertisement

दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश

अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी राज्य पातळीवर विविध अभियान राबविण्यात येत आहेत. त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना अवयवदानाचं महत्त्व समजावं यासाठी विज्ञान विषयाच्या पुस्तकात हा धडा सामाविष्ट करण्यात आला आहे.

दहावीच्या पुस्तकात अवयवदानाचाही समावेश
SHARES

राज्य शिक्षण मंडळाने १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित छापलेली पुस्तकं काही दिवसांपूर्वीच बाजारात उपलब्ध झाली आहेत. या पुस्तकांमध्ये शहिद कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांच्या शौर्यगाथेसह अवयवदानाच्या धड्याचाही समावेश करण्यात आला आहे.


देहदानासंदर्भातही माहिती

अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी राज्य पातळीवर विविध अभियान राबविण्यात येत आहेत. त्यातच शाळेतील विद्यार्थ्यांना अवयवदानाचं महत्त्व समजावं यासाठी विज्ञान विषयाच्या पुस्तकात हा धडा सामाविष्ट करण्यात आला आहे.

अवयवदान म्हणजे नेमकं काय? अवयवदानाचं महत्त्व, अवयवदान कशा पद्धतीने करता येऊ शकतं, यासह इतरही माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अवयवदानासोबतच या पुस्तकात देहदान या विषयावरही माहिती देण्यात आली आहे.


लोकांचा सहभाग कमी

समाजात अवयवदानासंदर्भात अनेक गैरसमज आहेत. आजही अवयवदान करण्यासाठी लोक पुढं येत नाहीत. यासाठी सध्या सर्वत्र जनजागृती मोहीम घेण्यात येत असली तरी देखील यात लोकांचा सहभाग फार कमी आहे. त्यामुळेच दहावीच्या अभ्यासक्रमात अवयवदान हा धडा सामाविष्ट करण्यात आल्याचं शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं.



हेही वाचा-

महापालिका शाळेत शिक्षकांची ७८१ पदे रिक्त

आता मुलांची पुस्तकं पीडीएफ स्वरूपात मोबाईलवरही!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा