Advertisement

एमजीएम रुग्णालयात यशस्वी अवयव प्रत्यारोपण, चौघांना जीवनदान


एमजीएम रुग्णालयात यशस्वी अवयव प्रत्यारोपण, चौघांना जीवनदान
SHARES

सध्या देहदान आणि अवयवदानाबाबत जनजागृतीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. २६ मार्चला वाशीच्या एमजीएम नवी मुंबईच्या रुग्णालयात झालेल्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान मिळालं आहे.


कुटुंबियांनी घेतला अवयवदानाचा निर्णय

४८ वर्षाच्या व्यक्तीच्या ब्रेनडेड झाल्यानंतर रुग्णालयाच्या समुपदेशनानंतर कुटुंबियांनी त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांचे अवयवदान करण्यात आले.

ही व्यक्ती नवी मुंबईतली राहणारी होती. आंघोळ करताना पाय घसरून पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि समन्वयकांनी त्यांच्या कुटुंबियांचं समुपदेशन केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.

या व्यक्तीचं ह्रदय चेन्नईच्या फोर्टीस रुग्णालयात पाठवण्यात आलं. तर, यकृत ग्लोबल रुग्णालयात देण्यात आलं. एक किडनी ज्युपिटरमध्ये प्रतिक्षायादीत असणाऱ्या एका रुग्णाला देण्यात आली तर, दुसरी एमजीएम रुग्णालयातील एका रुग्णाला देण्यात आली.

ही व्यक्ती आंघोळी करत असताना अचानक पाय घसरुन पडली. त्यांना तत्काळ रुग्णालयात आणलं. पण, डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केलं. कुटुबीयांचं समुपदेशन केल्यानंतर थोड्या वेळाने त्यांचे अवयवदान करण्यात आलं.
- वैभव, अवयवदान समन्वयक, एमजीएम रुग्णालय

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा