Advertisement

अवयवांसाठी अॅपच्या माध्यमातून करा नोंदणी


अवयवांसाठी अॅपच्या माध्यमातून करा नोंदणी
SHARES

प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना अवयव मिळवण्यासाठी झे़डटीसीसीमध्ये नावनोंदणी करावी लागते. शिवाय, ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट आहे. पण आता अवयवदान किंवा प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांसाठी अॅप आणि वेबसाईटची सुविधा सुरू करण्यात आली आहे. 


अॅप लॉन्च

झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी (झेडटीसीसी) ने प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या रुग्णांसाठी एक अॅप लॉन्च केलं आहे. झेडटीसीसीने तयार केलेल्या या अॅपच्या माध्यमातून गरजू रुग्णांना घर बसल्या अवयवांसाठी नोंदणी करता येऊ शकेल.

अवयव वेगवेगळ्या रुग्णालयात वितरण करणंही खरंतर खूप मोठी किचकट प्रक्रिया आहे. ज्या रुग्णालयामध्ये ब्रेनडेड व्यक्ती असेल त्या रुग्णालयाला आधी झेडटीसीसीमध्ये संपर्क करावा लागतो. त्यानंतर झेडटीसीसी आपल्या संपर्काचा आणि कॉम्प्युटरचा आधार घेऊन शहरात प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांची यादी काढते.

समन्वयामध्ये ४८ तास किंवा त्याहून अधिक कालावधी लागतो. त्यामुळे वेगवेगळ्या रुग्णालयांतील प्रत्यारोपण समन्वयक आणि झेडटीसीसी प्रत्येक अवयवदान चांगल्या पद्धतीने झालं पाहीजे म्हणूऩ झटत असतात.

- डॉ. सुरेंद्र माथुर, सरचिटणीस, झेडटीसीसीचे

‘झोनल ट्रान्स्प्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी’च्या १८व्या वर्धापनदिनानिमित्त दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अवयवदानाची प्रक्रिया जलदगतीनं आणि सुलभ व्हावी, यासाठी नवीन अॅपचं उद्घाटन करण्यात आलं. शिवाय या कार्यक्रमात अवयवदान करणाऱ्या मुंबईसह महाराष्ट्रातील जवळपास ४२ अवयवदात्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.


ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी अॅपची सुविधा

झेडटीसीसीमध्ये नावनोंदणी करणाऱ्या रुग्णांना नोंदणी कशी करायची? कुठे जायचं? याची माहिती नसते. शिवाय, नावनोंदणीसाठी फॉर्म भरताना अनेक कागदपत्रं सादर करावी लागतात. ही प्रक्रिया खूप मोठी आणि किचकट असते. अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ही प्रक्रिया सोयीस्कर करून देण्यासाठीच झेडटीसीसीने नवीन अॅप तयार केलं आहे. या अॅपद्वारे रुग्णांना घरी बसल्या फॉर्म भरून देता येऊ शकेल. शिवाय, सर्व कागदपत्रं, रुग्णांचा रक्तगट सर्व ऑनलाईन पद्धतीनं सादर करता येऊ शकतील.

आजही लोकांना अवयवदान कुठे आणि कसं करायचं याबाबतची माहिती मिळत नाही. त्यामुळे अवयवदानाची गरज असणारा रुग्ण अवयवापासून वंचित राहू नये यासाठी झेडटीसीसीने खूप महत्त्वपूर्ण काम केलं आहे.

- डॉ. दिपक सावंत, आरोग्यमंत्री

तर, झेडटीसीसीचे अध्यक्ष डॉ. गुस्ताद दावर यांनी १८ वर्षात मुंबईत अवयवदानाचा दर कशापद्धतीने वाढला याची माहीती दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा