नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२० रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ३२० रुग्ण सापडले आहेत. तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १४ हजार २५२ झाली आहे.  

सोमवारी बेलापूर ५२, नेरुळ ५४, वाशी ३८, तुर्भे ८, कोपरखैरणे ३७, घणसोली ७६, ऐरोली ३७, दिघामध्ये १८ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३०२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ७६, नेरुळ ३२, वाशी ६, तुर्भे १३, कोपरखैरणे २१, घणसोली १२४, ऐरोली १५, दिघामध्ये १५ नवे रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ९४४३ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ४४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.


हेही वाचा -

ऑगस्ट महिन्यात १२ दिवस बँका बंद

पोलिसांना मिळणार हक्काचे घर

मुंबईत ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पावसाची शक्यता


पुढील बातमी
इतर बातम्या