नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (१९ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३२५ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २१,७९८ झाली आहे.

 बुधवारी बेलापूर ५०, नेरुळ ५४, वाशी २७, तुर्भे २१, कोपरखैरणे ४८, घणसोली ५२, ऐरोली ५६ आणि दिघामध्ये १७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ४७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ७९, नेरुळ ६२, वाशी ५२, तुर्भे ५९, कोपरखैरणे ६२, घणसोली ६९, ऐरोली ५२ आणि दिघामधील ८ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १८००१ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५२० झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३२७७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  नवी मुंबईत आतापर्यंत ७ हजार ९८० प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. येथे एका दिवसाला अडीच हजारपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८३ टक्के झाला  आहे. 


हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम


पुढील बातमी
इतर बातम्या