Advertisement

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने चौपाट्यांवर व तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. विसर्जनासाठी महापालिका शहरात ५१ गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे तयार करणार आहे.

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी
SHARES

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने चौपाट्यांवर व तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. विसर्जनासाठी महापालिका शहरात ५१ गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे तयार करणार आहे.

२२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मिरा-भाईंदर महापालिकेने ११ ऑगस्ट रोजी नियमावली जाहीर केली. पारंपरिक शाडूच्या गणेशमूर्तींऐवजी घरात असलेल्या धातूच्या मूर्तींचे पूजन करून आगमन, विसर्जनासाठी गर्दीत जाणं टाळावं, असं आवाहन पालिकेनं केलं आहे.  हॉटस्पॉट क्षेत्रातील नागरिकांनी घरीच गणेश विसर्जन करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. इतर परिसरातील नागरिकांना चौपाटी व शहरातील तलावांमध्ये गणेशविसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांना गणेश विसर्जन करणे सोयीस्कर व्हावे, यासाठी ५१ ठिकाणी गणेशमूर्ती स्वीकृती केंद्रे तयार केली जाणार आहेत. त्यानंतर स्वीकृती केंद्रांतील मूर्तींचं विसर्जन केलं जाणार आहे.

स्वीकृती केंद्रे

प्रभाग १ - मॅक्सेस मॉल, सेकंडरी शाळा, महाराज स्वीट्स फाटक रोड

प्रभाग २ - सदानंद हॉटेल, शिवसेना गल्ली, वेलकांनी शाळा, नवरंग हॉटेल , जैन मंदिर, जय अंबे नगर

प्रभाग ३ -खरीगाव, केबिन रोड, प्रशांत हॉटेलजवळ, नाकोडा मशिदीसमोर, गोडदेव नाका, बंदरवाडी शिवसेना शाखा, श्री राम ज्वेलर्स बाजूला, काशी विश्वनाथ मंदिर, फादर जोसेफ शाळा, नवघर हनुमान मंदिर, नवघर गाव, शिर्डी नगर, नवघर गावदेवी मैदान

प्रभाग ४ - दीपक रुग्णालय, गोल्डन नेस्ट डावी व उजवी बाजू, स्व. गोपीनाथ मुंडे क्रीडासंकुल, ओम शांती चौक, सेव्हन इलेव्हन शाळा चौक, स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान, रामदेव पार्क, स्व. मीनाताई ठाकरे चौक, काशिगाव, जे. पी. इन्फ्रा घोडबंदर, हटके चौक, गौरव सिटी चौक, एमआयजी कॉम्प्लेक्स, कनकिया स्टार मार्केट, कनकिया सॅन्याँम शाळा

प्रभाग ५ - प्रभाग समिती कार्यालय, शरयू माता चौक, मिरा रोड रेल्वे स्थानक, शांती नगर सेक्टर ४ मैदान

प्रभाग ६ - महाविष्णू मंदिर मिरा गावठाण, प्रभाग समिती कार्यालय, सेंट पॉल शाळेसमोर, डॉन बॉस्को शाळा प्लेझंट पार्क, डॉन बॉस्को शाळा शांती पार्क, सेंट झेवियर शाळा, होली क्रॉस शाळा शितल नगर, जांगिड स्कूल शांती पार्क, सिल्व्हर पार्क



हेही वाचा -

बाप्पाच्या विसर्जनासाठी चौपाटीवर भाविकांना प्रवेश बंद

यंदा १६ टक्के जास्त पाऊस, पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता






Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा