नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३३० रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १२ हजार ५९९ झाली आहे.  

गुरूवारी बेलापूर ४९, नेरुळ ७७, वाशी ४२, तुर्भे १६, कोपरखैरणे ६८, घणसोली ३४, ऐरोली ३८, दिघामध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २११ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ३८, नेरुळ ४०, वाशी २८, तुर्भे ३२, कोपरखैरणे ३६, घणसोली १०, ऐरोली १८, दिघामध्ये ९ नवे रुग्ण बरे झाले आहेत.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८१३६ वर पोहोचली आहे.  नवी मुंबईत सध्या ४०९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना कोरोनाचा प्रार्दुभाव संपेपर्यंत सार्वजनिक सुट्ट्यांसह आठवड्यातील सातही दिवस कामावर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ‘ब्रेक द चेन’ ची मोहिम सुरू केली आहे.


हेही वाचा -

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू


पुढील बातमी
इतर बातम्या