Advertisement

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी खार विभागात कोरोनाची गती बर्‍यापैकी मंदावली आहे.

मुंबईत खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी
SHARES

मुंबई कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. मुंबईतील अनेक विभागात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग अधिक आहे. मात्र, खारमध्ये कोरोना वाढीचा वेग सर्वात कमी असल्याचं दिसून येत आहे. येथील रुग्णदुपटीचा कालावधी मुंबईत इतर विभागांपेक्षा अधिक आहे. येथील कोरोना नियंत्रणात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आलं आहे. 

मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी खार विभागात कोरोनाची गती बर्‍यापैकी मंदावली आहे. पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग सर्वाधिक आहे. तर खारमधील वाढीचा वेग सर्वात कमी आहे. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, १४ जुलै रोजी खारमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ३७७८ होती. तर २१ जुलै रोजी कोरोना रूग्णांचा आक़डा ३९२३ आहे. खारमध्ये कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल १२९ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील इतर कोणत्याही विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी इतका जास्त नाही. 

बुधवारी मुंबईत कोरोनाचे नवीन १३१० रुग्ण आढळले. तर ५८ रूग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण रूग्णांची एकूण संख्या १,०४,५७२ वर पोहोचली आहे. यामधील आतापर्यंत ७५,११८ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ५८७७ जणांचा मृत्यू झाला आहे.  



हेही वाचा -

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा