Advertisement

धारावीत बुधवारी कोरोनाचे अवघे ५ नवे रुग्ण

बुधवारी धारावीत केवळ ५ नवीन रुग्ण सापडले. धारावी नियंत्रणात असली तरी दादरमधील रुग्णसंख्या मात्र वाढताना दिसत आहे.

धारावीत बुधवारी कोरोनाचे अवघे ५ नवे रुग्ण
SHARES

मुंबईत कोरोनाचा हाॅटस्पॅाट ठरलेल्या धारावीतील रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. बुधवारी धारावीत केवळ ५ नवीन रुग्ण सापडले. धारावी नियंत्रणात असली तरी दादरमधील रुग्णसंख्या मात्र वाढताना दिसत आहे.  बुधवारी दादरमध्ये ५८ कोरोना रुग्ण सापडले आहेत.


 जी उत्तर विभागात बुधवारी  ७६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. येथील रुग्णांचा आकडा ५५३२ वर गेला आहे. धारावीतील रुग्णांची संख्या २५०७ वर पोहोचली आहे.   येथे केवळ १५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तसंच मागील काही दिवसात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला झाला नाही. दादरमध्ये ५८ नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांची एकूण संख्या ही १५०२ इतकी झाली आहे. तर ४६४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. माहीममध्ये १३ नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या १५२३ इतकी झाली आहे. माहीममध्ये २१२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.  

  

धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. आतापर्यंत दादर मध्ये एकूण ९६५, माहीममध्ये एकूण १२४१ तर धारावीत  २११६ असे एकूण ४३२२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 



हेही वाचा -

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा