Advertisement

वसई-विरारमध्ये कोरोनामुळे दोन दिवसांत २० जणांचा मृत्यू

वसई-विरार महापालिका क्षेत्रात रोज कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येथील रुग्णसंख्येने आता १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

वसई-विरारमध्ये कोरोनामुळे दोन दिवसांत २० जणांचा मृत्यू
SHARES

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दोन दिवसात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी वसई-विरारमध्ये १६९ नवे रुग्ण आढळले. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी १३७ नवीन रुग्ण आढळले असून ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


वसई-विरार महापालिका क्षेत्रात रोज कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. येथील रुग्णसंख्येने आता १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ६५८१ रुग्ण बरे झाले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने वसई-विरारमधील जवळपास २९ हॉटस्पॉट्स सीलबंद केले आहेत. या क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन आहे.  मुंबई, ठाणे जिल्हा, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईनंतर आता १० हजार रुग्णांचा आकडा पार करणारे वसई -विरार हे पाचवे शहर बनले आहे. 


लाॅकडाऊन लागू केल्यानंतरही वसई-विरारमधील कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली नाही. मागील दोन महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे. येथील एकूण रुग्णसंख्या १०,०१७ झाली आहे. तर आतापर्यंत १९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 



हेही वाचा -

पालिकेकडे गणपती मंडळांचे फक्त १५० अर्ज

अरे बापरे ! एका दिवसात १० हजार रुग्ण, २८० जणांचा दिवसभरात मृत्यू




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा