Advertisement

वसई-विरारमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, १० हजारांचा टप्पा पार

मंगळवारी वसई-विरार महानगरपालिकेनं (VVMC) अहवाल दिला की, या भागातील COVID 19 रुग्णांचा आकडा १० हजारच्या वर गेला आहे.

वसई-विरारमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, १० हजारांचा टप्पा पार
SHARES

मार्चपासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यानं मुंबई हादरलं आहे. ५ हजाराहून अधिकांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. तर १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. अलीकडेच, पालिकेनं मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, बर्‍याच दिवसानंतर शहरात गेल्या चोवीस तासांत कोरोना विषाणूचे केवळ १ हजार रुग्ण आढळले आहेत. पण मुंबईच्या शेजारच्या जिल्ह्यांविषयी बोलताना तिथली गणितं काही वेगळी आहेत.

मंगळवारी वसई-विरार महानगरपालिकेनं (VVMC) अहवाल दिला की, या भागातील COVID 19 रुग्णांचा आकडा १० हजारच्या वर गेला आहे. तर जवळपास १९२ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या इथला कोरोना रुग्णांचा आकडा १० हजार ०१७ च्या घरात गेला आहे.

हेही वाचा : मीरा-भाईंदरमध्ये दुकानं सम-विषम पद्धतीने उघडण्याची परवानगी

नागरी संस्थेच्या म्हणण्यानुसार, या भागात संक्रमित रूग्णांची संख्या ३ हजार २४४ आहे. नागरी संस्थेनं दिलेल्या आकडेवारीवरून असंही दिसून आलं आहे की, या भागातील ६ हजार ५८१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. वसई-विरारमधील जवळपास २९ हॉटस्पॉट्स सीलबंद करण्यात आली आहेत. ३१ जुलैपर्यंत हा परिसर बंद करण्यात आला आहे.

मुंबई शहर, ठाणे जिल्हा, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईनंतर COVID 19 रुग्णांचा १० हजाराचा आकडा गाठणारे वसई-विरार पाचवे शहर झाले आहे. एमएमआर अंतर्गत क्षेत्रात गेल्या दोन महिन्यांपासून COVID 19 रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे.

दरम्यान, मंगळवारी महाराष्ट्रात ८ हजार ३६९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, १ लाख ३२ हजार २३६ रुग्ण अक्टीव्ह आहेत. या आकडेवारीसह राज्यातील आकडा ३ लाख २७ हजार ०३१ च्या घरात गेला आहे. गेल्या २४ तासात २४६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर राज्यात १२ हजार २७६ रुग्णांनी आपले प्राण गमावले.



हेही वाचा

ग्लेनमार्क फार्मा कंपनीला नोटीस, COVID 19 वरील औषधं जास्त किंमतीत विकल्याचा आरोप

मिरा-भाईंदरमध्ये रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 'इतकं'

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा