Advertisement

शरीराचं तापमान मोजण्यासाठी 'या' तंत्रज्ञानाचा वापर

उत्तर मुंबईतील कोरोनाबाधितांची रुग्णवाढ कमी करण्यासाठी महापालिकेनं घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्याचा संकल्प केला आहे.

शरीराचं तापमान मोजण्यासाठी 'या' तंत्रज्ञानाचा वापर
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे. मुंबईच्या अनेक भागातील कोरोनाबाधित रुग्ण व कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. अशातच उत्तर मुंबईतील कोरोनाबाधितांची रुग्णवाढ कमी करण्यासाठी महापालिकेनं घरोघरी जाऊन रहिवाशांची तपासणी करण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गत एकाच वेळी लांबून १५ लोकांचा ताप मोजण्यासाठी अत्याधुनिक हेल्मेट वापरण्यात येत आहे.

झोपडपट्टी भागात रहिवाशांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी या हेल्मेटचा वापर महापालिकेसाठी खूप उपयोगी ठरत आहे. उत्तर मुंबईत दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड या भागांत गेल्या काही दिवसांपासून रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्यामुळं महापालिका आयुक्तांनी या भागात मिशन झिरो कृती आराखड्यांतर्गत घरोघरी जाऊन लोकांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

या कार्यक्रमांतर्गत महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत आरोग्य शिबिरं आयोजित करून रहिवाशांची तपासणी केली जात आहे. मात्र, झोपडपट्टीसारख्या जास्त घनता असलेल्या भागात जाऊन प्रत्येकाची तपासणी करणं अनेकदा जिकिरीचे होते. अशा परिस्थितीत महापालिकेनं आता खास अत्याधुनिक हेल्मेटचा वापर करण्याचा प्रयोग केला आहे.

भारतीय जैन संघटनेच्या मदतीनं उत्तर मुंबईत या हेल्मेटच्या साहाय्यानं रहिवाशांचा ताप मोजला जात आहे. संस्थेचा एक तज्ज्ञ व्यक्ती हे हेल्मेट घालून वस्त्यांमध्ये जातो, त्याच्याबरोबर महापालिकेच्या आरोग्य सेविका असतात. अनेकदा लोक घराबाहेर येत नाहीत, तपासणी करायला घाबरतात अशा वेळी आरोग्य सेविका लोकांना घरातून बाहेर बोलावतात किंवा दरवाजा उघडायला सांगतात व लांबूनच या हेल्मेटनं ताप मोजता येतो.

या हेल्मेटमुळं एका मिनिटात २०० व्यक्तींचा ताप मोजता येतो. थर्मल गननं ताप मोजण्यासाठी वेळ लागतो. हा वेळही वाचतो. तसेच लांबूनच ताप मोजता येत असल्यानं संसर्गाचा धोका टळतो. आतापर्यंत दहिसर, मालाड, कांदिवलीतील वीस हजार लोकांची तपासणी करण्यात आल्याची माहिती मिळते. या हेल्मेटमध्ये सेन्सर असून तो हातावरील एका विशिष्ट घड्याळाशी जोडलेला आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान सामान्यांपेक्षा जास्त आहे असं वाटलं तर त्याला वेगळं करून त्याची तपासणी केली जाते.



हेही वाचा -

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा