पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ३४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी  (२४ डिसेंबर) ३४ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून २९ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १,  नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी ७, कळंबोली ५, कामोठे ५, खारघर  येथील १३ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ३, कळंबोली ४, कामोठे ८, खारघर ९, तळोजा  येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७२४० कोरोना रूग्णांपैकी २६३०३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५९५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३४२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 

दरम्यान, पनवेल तालुक्यातील शेतघरांवर नववर्ष स्वागतासाठी दरवर्षी मोठय़ा प्रमाणात पाटर्यांचं आयोजन केलं जातं. यंदा कोरोनामुळे या ठिकाणी गर्दी होऊ नये व नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. शेतघर मालकांसमवेत बैठका घेत याबाबतच्या सूचना करण्यात येत आहेत. त्यानुसार खांदेश्वर, पनवेल तालुका आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यांमध्ये या बैठकांचे सत्र सुरू आहे.


हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही


पुढील बातमी
इतर बातम्या