Advertisement

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही

रेल्वे प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकलमधील दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत.

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही
SHARES

रेल्वे प्रवास करणाऱ्या दिव्यांग प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकलमधील दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळं आता दिव्यांग डब्यातील घुसखोरी रोखणं आणि डब्यातील गुन्हेगारीला आळा घालणं शक्य होणार आहे. 

एल्फिन्स्टन पादचारी पूल दुर्घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबई लोकलमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना गोयल यांनी दिल्या होत्या. 

इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये (आयसीएफ) बांधणी करण्यात आलेल्या ३ लोकल आणि सिमेन्स बनावटीची १ अशा एकूण ४ लोकलमधील दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहे. या लोकलच्या सर्व डब्यांत सीसीटीव्ही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नव्याने बांधणी होणाऱ्या लोकलमधील सर्व डब्यांत सीसीटीव्ही असणार आहे. त्याशिवाय, सध्या सेवेत असलेल्या लोकलमध्ये टप्प्याटप्यानं सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा