पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३५ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (९ नोव्हेंबर) ३५ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १०४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर २ मृत्यूंची नोंद झाली असून पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४, नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी १, कळंबोली २, कामोठे १३, खारघर १०, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल १९, कळंबोली ९, कामोठे २५, खारघर येथील ४६ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २४०६० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २३०२२ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५६३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४७५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा-

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

महानगरपालिका क्षेत्रात फटाके फोडणं किंवा आतषबाजी करण्यावर बंदी


पुढील बातमी
इतर बातम्या