अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अर्णब गोस्वामींना जामीन नाहीच, उच्च न्यायालयाने फेटाळला अर्ज
SHARES

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तसंच कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश देखील गोस्वामी यांना दिले. यामुळे त्यांचा तुरूंगातील मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. (bombay high court rejects bail plea of arnab goswami)

अंतरिम जामीन मिळावा म्हणून अर्णब गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संबंधित याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आपला निर्णय दिला. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचं हे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय ४ दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं म्हणत उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाची मागणी फेटाळून लावली. सोबतच न्यायालयाने या प्रकरणातील सहआरोपी नितीश सारडा आणि फेरोज शेख यांचीही जामिनाची मागणी देखील फेटाळून लावली आहे.

हेही वाचा- अर्णब गोस्वामीचा तुरूंगातील मुक्काम वाढला

याआधी शनिवारी झालेल्या सुनावणीत अर्णब गोस्वामी यांच्यावर केवळ कुहेतूने कारवाई करण्यात येत असल्याने आरोपीच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं आणि मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत आहे. त्यामुळे आरोपीच्या सुटकेचा अंतरिम दिलासा देणारा आदेश करावा. न्यायालयाला दिवाळीची सुट्टी लागेल आणि अर्णब यांना जामीन मिळू शकणार नाही, याची सरकारला जाणीव होती. त्यामुळेच त्यांना धडा शिकवण्यासाठी अटक करण्यात आली, असा युक्तीवाद अर्णब गोस्वामी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी केला होता.

त्यावर सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल. तरीही लवकरात लवकर आम्ही अर्जावरील निर्णय जाहीर करू, असं म्हणत न्यायालयाने या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. 

हेही वाचा- अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा