पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ३६ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (९ डिसेंबर) ३६ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ७३ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. याशिवाय ICMR च्या निर्देशानुसार याआधीच्या ७३९ नव्या रूग्णांची तसेच तेवढ्याच म्हणजे ७३९ बऱ्या झालेल्या रूग्णांची आज नोंद करण्यात आली आहे. याशिवाय नवीन पनवेल येथील एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ३, नवीन पनवेल ३,  खांदा काॅलनी २, कळंबोली ३, कामोठे ७, खारघर १६,  तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ११, नवीन पनवेल २२, कळंबोली ७, कामोठे १३, खारघर येथील २०  रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २६६९१ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २५६७८ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४२९ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



पुढील बातमी
इतर बातम्या