धारावीत गुरूवारी आढळले ३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनाचा हाॅटस्पाॅट असलेल्या धारावीत गुरूवारी नवीन ३६ रूग्ण आढळले. आतापर्यंत धारावीतील रुग्णसंख्या १६७५ झाली आहे. मुंबईत 70 सार्वजनिक रूग्णालयं 20 हजार 700 बेडची सार्वजनिक रूग्णालयांची क्षमता. मुंबईत 1 हजार 500 खासगी रुग्णालयं. 1हजार 500 बेडची खासगी रूग्णालयांची क्षमता आहे.

देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण मुंबईत आहेत. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार 835 वर पोहोचली. मुंबईतील वॉर्डचा विचार करता सर्वाधिक कोरोना रुग्ण जी-उत्तर वॉर्डमध्ये आहेत. हा वॉर्ड म्हणजे धारावीचा परिसर.

मुंबईत गेल्या सात दिवस दररोज सरासरी 5.17 टक्क्यांनी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. माहीम, धारावी आणि दादर परिसरात तब्बल 2,728 कोरोना रुग्ण आहेत. धारावी परिसरातील वाढत्या प्रकरणांमुळे मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही झपाट्याने वाढतो आहे. तर आर उत्तर म्हणजे दहिसर क्षेत्रात सर्वात कमी 309 कोरोना रुग्णांची नोंद आहे. 


हेही वाचा -

मान्सूपूर्व काम अर्धवट, यंदा मुंबई तुंबण्याची शक्यता

२५ डॉक्टर्स वास्तव्यास असणाऱ्या फॉर्च्युन हॉटेलमध्ये लागली आग


पुढील बातमी
इतर बातम्या