पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी ३९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत गुरूवारी (१० डिसेंबर) ३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ४५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ६,  खांदा काॅलनी १, कळंबोली ६, कामोठे १४, खारघर येथील १२ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ४, नवीन पनवेल ५, कळंबोली १०, कामोठे ९, खारघर येथील १७  रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २६७३० कोरोनाबाधित रूग्णांपैकी २५७२३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८४ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४२३ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार


पुढील बातमी
इतर बातम्या