Advertisement

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप

सरकारनं अशावेळी लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केलं आहे.

कोरोना लस : सरकार लाँच करणार Co-WIN अॅप
SHARES

भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. आपातकालीन लसीच्या वापरासाठी देशातील तीन कंपन्यांनी केंद्र सरकारकडे परवानगी अर्ज केले आहेत.

लस आता कशी दिली जाणार, यासाठी कोण कोण लाभार्थी असणार, त्याचे टप्पे, वितरण आदीचा आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. लसीकरणाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सरकारनं अशावेळी लसीकरणासाठी नोंदणी करण्यासाठी एक अ‍ॅप विकसित केलं आहे.

Co-WIN असं या अ‍ॅपचं नाव असून हे अॅप मोफत डाऊनलोड करता येणार आहे. पण हे अ‍ॅप सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्यामुळे ते तुम्हाला डाऊनलोड करता येणार नाहीय. अशाप्रकारचे दुसरे अ‍ॅप कुठेही आढळल्यास ते डाऊनलोड करू नका. ते फेक असू शकते शिवाय तुमचा डेटा हॅकर्सना मिळू शकतो. या अ‍ॅपच्या लाँचची अधिकृत घोषणा केंद्र सरकार लवकरच करणार आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या अ‍ॅपबाबतची माहिती दिली आहे.

लसीकरण प्रक्रियेपासून प्रशासनाचे काम, लसीकरण कर्मचाऱ्यांची तसंच ज्यांना लस द्यायची आहे त्यांची माहिती को-विन अ‍ॅपमध्ये दिली जाणार आहे. यामध्ये सेल्फ रजिस्ट्रेशनचाही पर्याय असणार आहे. या अ‍ॅपद्वारे ग्रामपंचायत सरपंच देखील त्याच्या गावातील लोकांच्या लसीकरणासाठी अर्ज करू शकणार आहे.

तीन टप्प्यांमध्ये भारतात लसीकरण केलं जाईल. आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन सेवा कर्मचारी असे दोन टप्पे आहेत. याची माहिती गोळा करण्याचे काम राज्य सरकारांना देण्य़ात आले आहे. तिसऱ्या टप्प्यात कोरोना लस ही गंभीर आजारांशी लढणाऱ्या लोकांना दिली जाणार आहे. Co-WIN अ‍ॅपवर या सर्वांची नोंदणी होणार आहे.

पाच टप्प्यांमध्ये को विन अ‍ॅप विभागले गेले आहे. प्रशासनिक मॉड्यूल, रजिस्ट्रेशन मॉड्यूल, लसीकरण, लाभ स्वीकृती मॉड्यूल, रिपोर्ट अशी पाच मॉड्यूल यामध्ये आहेत. रिपोर्टद्वारे लाभार्थीला आणि देणाऱ्यांना नोटिफिकेशन पाठवलं जाणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा