सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार

राज्याच्या ग्रामीण भागातील प्रतिसाद पाहून मुंबईतही हा पर्याय वाहनचालकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या उच्चाधिकार समितीनं घेतला आहे.

सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास पोलीस रोख स्वरूपातही दंड वसूल करणार
SHARES

वाहतुकीच्या नियमांचं पालन करा असं वारंवार वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येतं. मात्र, अनेक चालक हे नियम पाळत नसून भरधाव वेगानं गाड्या चालवतात. त्यामुळं या चालकांवर कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ई चलान प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर चलनविरहित किंवा ऑनलाईन दंडआकारणी सुरू झाली. दंड भरण्याची सर्वस्वी जबाबदारीही चालकांवर सोपविण्यात आली. त्यामुळं दंडआकारणी आणि दंड वसुलीत प्रचंड तफावत निर्माण झाली. मात्र, यावर उपाय म्हणून आता मा नियमभंग केल्याबद्दल होणारा दंड आता वाहनचालकांना रोख स्वरूपातही भरता येणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागातील प्रतिसाद पाहून मुंबईतही हा पर्याय वाहनचालकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाच्या उच्चाधिकार समितीनं घेतला आहे. दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आजवर अनेक उपाय योजले. मात्र ही तफावत काही केल्या कमी होऊ शकली नाही. 

दंड वसुली वेळच्या वेळी का होत नाही? प्रलंबित दंडाचा डोंगर का वाढतो? दंड वसूल करण्यासाठी प्रभावी उपाय कोणता? या मुद्द्यांवर शासनाच्या उच्चाधिकार समितीत चर्चा झाली. त्यावेळी समिती सदस्य आणि वाहतूक पोलीस दलाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांनी दंड रोख स्वरूपात वसूल करण्यास परवानगी मिळाल्यास ही तफावत कमी होऊ शकणार असल्याचं सुचवलं.

मुंबईत प्रत्येक चालकाकडं डेबिट, क्रेडिट कार्ड नाही. प्रत्येक जण अ‍ॅपआधारे दंडाची रक्कम भरू शकत नाही. ई बँकिंग, ऑनलाईन आर्थिक व्यवहार किंवा चलनविरहित व्यवहारांबाबत बहुतांश चालक अनभिज्ञ असल्याचं वाहतूक पोलिसांनी नोंदवलं. त्यामुळं प्रलंबित दंडाची रक्कम अधिक काळ शिल्लक राहते. त्यामुळं रोख रकमेद्वारेही दंड अदा करण्याचा पर्याय दिल्यास तो असंख्य चालकांना सोपा, सुलभ वाटू शकणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा