नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३९० रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (१० सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३९० रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २९,५५५ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ७२, नेरुळ ५२, वाशी ६२, तुर्भे ६६, कोपरखैरणे ६९, घणसोली १३, ऐरोली ५२, दिघामध्ये ४ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३८४ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६३ नेरुळ ४७, वाशी ९९, तुर्भे ३०, कोपरखैरणे ४८,  घणसोली ५९, ऐरोली २९ आणि दिघामधील ९ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५४३९ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६४७ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३४६९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत दीड लाख करोना चाचण्या करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा दर हा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या