कल्याण डोंबिवलीत नवीन ४०५ कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी नवीन ४०५ कोरोनाचे रुग्ण आढळले.  तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे.  गेल्या २४ तासांत २२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील कोरोना रुग्णांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३०,०५४ झाली आहे. यामध्ये ३२८६ रुग्ण उपचार घेत असून २६,११२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६४, कल्याण प. ११७, डोंबिवली पूर्व १११, डोंबिवली प ४८, मांडा टिटवाळा  ४९, मोहना १३, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ८ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून तर ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -
मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी घटला
सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची होतेयं बदनामी, ८ निवृत्त अधिकाऱ्यांनी घेतली कोर्टात धाव


पुढील बातमी
इतर बातम्या