राज्यात ४३ हजार १८३ नवे रुग्ण, २४९ रूग्णांचा मृत्यू

राज्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. रोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असून मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. गुरूवारी राज्यात कोरोनाचे तब्बल  ४३ हजार १८३ नवे रुग्ण आढळले.  गेल्या ६ महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर  २४९ जणांचा मृत्यू झाला. 

गुरूवारी  ३२ हजार ६४१ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २४,३३,३६८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८५.२ टक्के एवढे झाले आहे.राज्यातील मृत्यू दर १.९२ टक्के आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २८,५६,१६३ (१४.३० टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,०९,४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ३,६६,५३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत


हेही वाचा -

  1. मुंबईत कोरोनाचा उद्रेक, गुरूवारी तब्बल 'इतके' नवे रुग्ण
  1. ठाणे जिल्ह्यात हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मद्यविक्री बंद
पुढील बातमी
इतर बातम्या