पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ४४ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (११ डिसेंबर) ४४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १२,  नवीन पनवेल १, खांदा काॅलनी ४, कळंबोली ६, कामोठे ७, खारघर १३, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १०, नवीन पनवेल १५, कळंबोली ३, कामोठे १४, खारघर ३८, तळोजा येथील २  रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २६७७४ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २५९०५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५८४ जणांचा  मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३८५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द


पुढील बातमी
इतर बातम्या