कल्याण-डोंबिवलीत रोज ४५० ते ५५० नवीन रुग्ण

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र आता कोरोनाचा हाॅटस्पाॅट झाला आहे. येथील रुग्णसंख्या आता १७ हजारांच्या पुढे गेली आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी या ठिकाणी पुन्हा लाॅकडाऊन लागू करण्यात आला. मात्र, याचा फायदा झाल्याचं दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत.

 मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रात रोज ११०० ते १२०० रुग्ण आढळून येत आहेत.  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या २० दिवसांपासून रोज ४५० ते ५५० रुग्ण आढळून येत आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात रोज ३०० ते  ४००  रुग्ण आढळून येत आहे. ठाण्यापेक्षा कल्याण-डोंबिवलीत रुग्ण वाढीचा वेग जास्त आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १७ हजार ६४० वर गेली आहे. यापैकी ९ हजार ३०७ रुग्ण  २ ते १९ जुलै या कालावधीतील आहेत.  तर, ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १६ हजार ८९४ इतके रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये करोना रुग्ण संख्येत कल्याण-डोंबिवली दुसऱ्या स्थानावर असल्याचं दिसून येत आहे.  


हेही वाचा -

‘कोविड’ संशयित मृत्यू म्हणजे नेमकं काय?, नितेश राणेंचा बीएमसीला प्रश्न

महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी


पुढील बातमी
इतर बातम्या