कल्याण डोंबिवलीत ४५८ नवीन रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात रविवारी कोरोनाचे नवीन ४५८ रुग्ण आढळले. तर ६ जणांचा मृत्यू झाला. रविवारी ५७५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३८,७५९ झाली आहे. यामध्ये ५३२८ रुग्ण उपचार घेत असून एकूण ३२,६६३ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यत ७६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६५, कल्याण प  १३८, डोंबिवली पूर्व १४०, डोंबिवली प ८८, मांडा टिटवाळा १६, मोहना ९, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  १० रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला पुन्हा COVIDचा संसर्ग, मुंबईतील पहिलीच केस 

ठाकरे सरकार क्वीन्स नेकलेसचं सौंदर्य का बिघडवतंय ? भाजपचा प्रश्न


पुढील बातमी
इतर बातम्या