धक्कादायक! KEM रुग्णालयात गेल्या ३६ दिवसांत ४६० कोरोना मृत्यू

देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही कोरोना संसर्गाचं केंद्र बनली आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक कोरोना मृत्यू हे देखील मुंबईतच झाले आहेत. मुंबईतील सगळ्यात भरवशाच्या महापालिकेच्या (460 covid-19 patients died in last 36 days in KEM hospital) केईएम रुग्णालयांत गेल्या ३६ दिवसांत ४६० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने इतर रुग्णांच्या कुटुंबियांमध्ये दहशत पसरली आहे. आॅक्सिजनच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. 

गेल्या २० दिवसांत २२१ मृत्यू  

केईएम रुग्णालयात गेल्या २० दिवसांत २२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर १५ मे पासून आतापर्यंत एकूण ४६० रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अत्यंत कमी दिवसांमध्ये इतके मृत्यू झाल्यानेच रुग्णालयावर आरोप केले जात आहेत. प्रामुख्याने ऑक्सिजनअभावी बहुतांश मृत्यू होत असल्याचा आरोप कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. १ मे ते ३१मे दरम्यान दररोज सरासरी १५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार १ जून ते २० जून या काळात एकूण २४० मृत्यूची नोंद झाली आहे. म्हणजेच रुग्णालयात दररोज सरासरी ११ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांच्या मते, कोरोना शिगेला पोहोचला आहे. १५ मे ते २० जून या कालावधीत झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत.

हेही वाचा - 'इथं' होणार कोरोनाची अँटीजन टेस्ट, ३० मिनिटात रिझल्ट

ऑक्सिजनची कमतरता  

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू होत असल्याचा आरोप रुग्णालय प्रशासनावर होत आहे, यांत किती तथ्य आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना हेमंत देशमुख यांनी सांगितलं की रुग्णालयात ११ हजार लिटर ऑक्सिजनची तरतूद आहे. तसंच टॉप-अप सिस्टीमही वापरली जात आहेत. म्हणजे जेव्हा २० टक्के ऑक्सिजन उरतो तेव्हा तो त्वरीत भरला जातो.

कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे हे नाकारता येणार नाही. परंतु केवळ ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचं म्हणणं चुकीचे आहे. कारण बर्‍याच वेळा रुग्ण रूग्णालयात अत्यंत उशिरा येतात. जेव्हा त्यांना दाखल केलं जातं तेव्हा त्यांची परिस्थिती खूपच नाजूक असते. इतकंच नव्हे तर रूग्णांची मेडिकल हिस्ट्री म्हणजेच त्याला आधीपासूनच कुठला गंभीर आजार आहे का? हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरतं.

केईएम रुग्णालयाविषयीच्या बातम्या, व्हिडिओ सतत व्हायरल होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अविनाश कुमार यांनी आपल्या सासऱ्यांना ६ मे रोजी मे रोजी दाखल केलं होतं. परंतु रुग्णालयात काय चाललं आहे, याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. ते म्हणतात की पहिल्या दिवशी त्यांना ऑक्सिजन देण्यात आला होता, परंतु त्यानंतर त्यांच्यावर कसे उपचार सुरू आहेत. याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही. वारंवार कॉल करूनही माहिती दिली जात नाही. दररोज रुग्णालयाच्या चकरा मारून देखील काहीही कळलेलं नाही. त्यामुळे ते खूप घाबरले आहेत.

भलेही हे मृत्यू आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले नसोत, पण मृत्यू झाले आहेत, हे तरी कुणी नाकारू शकत नाही. कारण वाढणारे आकडे याची साक्ष देत आहेत. हाच सर्वांच्या चिंतेचा विषय ठरला आहे.

हेही वाचा - वांद्रे, माटुंगा, भायखळा, वडाळा कोरोनामुक्तीच्या दिशेने

पुढील बातमी
इतर बातम्या