Advertisement

'इथं' होणार कोरोनाची अँटीजन टेस्ट, ३० मिनिटात रिझल्ट

कोरोना चाचण्या कोणाच्या आणि कुठे करता येतील यासंदर्भात आयसीएमआरनं या गाईडलाईन्स बनवल्या आहेत.

'इथं' होणार कोरोनाची अँटीजन टेस्ट, ३० मिनिटात रिझल्ट
SHARES

कोरोनाच्या चाटणीसाठी (coronavirus Update) चायनावरून मागवलेल्या किट खराब निघाल्यानंतर साऊथ कोरीयातून नवीन कोरोना तपासणीसाठी किट मागवण्यात आल्या. या किटमुळे ३० मिनिटात कोरोनाचा निकाल हाती येऊ शकतो. त्यामुळे सरकारनं त्याच्या वापराला परवानगी दिली आहे.


‘यांना’ करावी लागेल चाचणी

सरकारनं परवानगी देताच इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)नं सर्व राज्यांना अँटीजन टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे. आयसीएमआरनं या किटच्या मदतीनं कोरोना चाचण्या जास्तीत जास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सर्व हॉस्पिटल्स, ऑफिस आणि पब्लिक सेक्टर यूनिट्सला रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा सल्लाही दिला आहे.

आयसीएमआरनुसार, अँटीजन टेस्ट किटद्वारे ऑन द स्पॉट चाचणी केली जाऊ शकते. याचा निकाल ३० मिनीटात मिळू शकतो. एक किटची किंमत ४५० रुपये आहे. जर कोरोना संशयिताचा अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाईल.


गाईडलाईन्सनुसार होणार चाचणी

आयसीएमआरनं यासाठी काही गाईडलाईन्स तयार केल्या आहेत. या गाईडलाइन्सनुसारच कोरोना चाचण्या केल्या जातील. कोरोना चाचण्या कोणाच्या आणि कुठे करता येतील यासंदर्भात आयसीएमआरनं या गाईडलाईन्स बनवल्या आहेत. आपल्या गाइडलाइन्समध्ये प्रत्येक कंन्टेंमेंट झोनमधील सरकारी-खासगी हॉस्पिटल आणि प्रायवेट लॅब्सला ही चाचणी उपलब्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.

आयसीएमआरनं जारी निर्देशात सांगितलं की, 'सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, ऑफिस आणि पब्लिक सेक्टर यूनिटला अँटीजन टेस्ट करण्यासा सल्ला दिला जात आहे. ही चाचणी आरोग्य कर्मचारी आणि इतर ऑफीस कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आहे.'


कुठे होणार चाचणी?

  • राज्य सरकारद्वारे चिन्हित कंन्टेंमेंट झोन
  • सर्व सेंट्रल-स्टेट गवर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल
  • नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थकेअरच्या मान्यता प्राप्त प्रायवेट हॉस्पिटल्स
  • नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर लॅबोरेट्रीजनं मान्यता प्राप्त प्रायवेट लॅब्स
  • आयसीएमआर मान्यता प्राप्त टेस्टिंग लॅब


कोण करू शकतं?

आयसीएमआरनुसार, कंन्टेमेंट झोन आणि हॉटस्पॉटमध्ये इंफ्लुएंजासारखी लक्षणं आढळल्यास अँटीजन टेस्ट करावी लागेल. लक्षणे नसलेल्या व्यक्तींची किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतरही टेस्ट केली जावी. याशिवाय हॉस्पिटल्समध्ये असलेल्या कीमोथैरेपी आणि ट्रांसप्लांटचे रुग्ण आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींचीही चाचणी करावी लागेल.

३० मिनिटात मिळणार निकाल

आयसीएमआरनुसार, राज्यांना स्टँडर्ड अँटीजन किट (Q COVID-19 Ag kit)नेच चाचणी करण्याचा सल्ला देत सांगितलं की, या चाचणीसाठी कोणत्याही मशीनची गरज नाही आणि ३० मिनीटात चाचणी पूर्ण होईल. या चाचणीची रिपोर्ट डोळ्यांनी पाहता येईल. ही कीट साउथ कोरियामधील कंपनी एसडी बायोसेंसरनं तयार केली आहे.



हेही वाचा

कोरोनानंतर 'या' आजाराचा मुंबईत शिरकाव, ३१ जणांचा मत्यू

मुंबईतील प्रसिद्ध बिस्लेरी पाणीपुरीवाल्याचं कोरोनानं निधन, नागरिकांनी...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा