Advertisement

वांद्रे, माटुंगा, भायखळा, वडाळा कोरोनामुक्तीच्या दिशेने

उत्तर मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागांतील रुग्णांची संख्या वाढत असून उर्वरित २० विभागांतील रुग्णसंख्या कमी होत आहे.

वांद्रे, माटुंगा, भायखळा, वडाळा कोरोनामुक्तीच्या दिशेने
SHARES
मुंबईतील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता तब्बल ३९ दिवसांवर पोहोचला आहे. तर मुंबईचा रुग्णवाढीचा सरासरी दरही कमी होऊन १.८१ टक्के इतका झाला आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी, भायखळा, धारावी, कुर्ला या भागात कोरोना आटोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे. 


उत्तर मुंबईतील मालाड, कांदिवली, बोरिवली आणि दहिसर या भागांतील  रुग्णांची संख्या वाढत असून उर्वरित २० विभागांतील रुग्णसंख्या कमी होत आहे. तसेच रुग्णदुपटीचा कालावधीही वाढत चालला आहे. भायखळा, वांद्रे, माटुंगा, वडाळा या भागांची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एच पूर्व (वांद्रे) विभागातील रुग्णदुपटीचा कालावधी तब्बल ८८ दिवसांवर, एफ उत्तर (माटुंगा) ८२, ई (भायखळा) विभागाचा ७४,  एल (कुर्ला)  ७० दिवस असा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आहे. 

वांद्रे एच पूर्वचा रुग्णवाढीचा सरासरी दर सर्वात कमी  ०८. टक्के असा आहे. तर माटुंगा आणि भायखळा विभागांचा रुग्णवाढीचा सरासरी दर ०.९ टक्के झाला आहे. कुर्ला विभागातही हा  दर एक टक्क्यांवर आला आहे.

विभागनिहाय रुग्णवाढीचा दर (टक्क्यांमध्ये)

वांद्रे ०.८

माटुंगा ०.९

भायखळा ०.९

कुर्ला १.०

चेंबूर १.१

कुलाबा १.१

मशिद बंदर १.२

गोवंडी १.२

वरळी १.३

धारावी १.३

घाटकोपर १.६

परळ १.७

गोरेगाव १.८

ग्रँट रोड २.०

काळबादेवी २.०

अंधेरी पूर्व २.०

अंधेरी पश्चिम २.०

मालाड ३.०

कांदिवली २.६

बोरिवली ३.८

दहिसर ३.२

मुलुंड ३.७



हेही वाचा -

अंधेरी बनला कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' परिसरात कोरोनाचा शिरकाव

Cops Track Down 44 ‘Missing’ Covid Patients : ‘त्या’ बेपत्ता रुग्णांना शोधण्यात यश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा