कल्याण डोंबिवलीत ४८५ नवे रुग्ण, ६ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सोमवारी कोरोनाचे नवीन ४८५ रुग्ण आढळले.  तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ३२४ रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३१,९८८  झाली आहे. यामध्ये ३९७८ रुग्ण उपचार घेत असून २७,३२६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६३,  कल्याण प.१०८, डोंबिवली पूर्व १७६, डोंबिवली प ९०, मांडा टिटवाळा ३९, मोहना ७, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ११ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा -

मुंबईत अतिदक्षता खाटांची कमतरता

लोकल ट्रेन सुरू झालीच पाहिजे! विरार स्थानकात प्रवाशांचा उद्रेक


पुढील बातमी
इतर बातम्या