नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ४९ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (११ जानेवारी) कोरोनाचे नवीन ४९ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ७८८ झाली आहे. 

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १७, नेरुळ ४, वाशी १३, तुर्भे ७, कोपरखैरणे ६, घणसोली ३, ऐरोली ८, दिघा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर ८९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर २५, नेरुळ १६, वाशी ११, तुर्भे १०, कोपरखैरणे ८,  घणसोली १२, ऐरोली ६, दिघा येथील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,८४५ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७० झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात ८०,६२४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. 


हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई


पुढील बातमी
इतर बातम्या