Advertisement

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई

अद्याप सर्वसामान्य पुरुष प्रवाशांना प्रवास मुभा नाही आहे. त्यामुळं अनेकजण विनातिकीट लोकलनं प्रवास करत आहेत.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. साध्यस्थीतीत महिलांना ही प्रवासाची मुभा असली तरी अद्याप सर्वसामान्य पुरुष प्रवाशांना प्रवास मुभा नाही आहे. त्यामुळं अनेकजण विनातिकीट लोकलनं प्रवास करत आहेत. अशा तब्बल १४ हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे.

१ जानेवारी ते ८ जानेवारी कालावधीत मध्य रेल्वेनं विनातिकीट प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईत १४ हजार प्रवाशांची धरपकड केली. शुक्रवारी अत्यावश्यक सेवा कर्मचारी असल्याची बनावट ओळखपत्रे बाळगलेल्या ५४ जणांना पकडण्यात आले. त्यांची ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. सध्या मध्य रेल्वे स्थानकातील प्रवेशद्वाराजवळील सुरक्षा काढल्यानंतर अनेक जण बिनदिक्कत प्रवेश मिळवत असल्याचे सांगण्यात आले.

जून महिन्यापासून अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यानंतर विविध श्रेणींना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर प्रवाशी संख्या वाढू लागली. सध्याच्या घडीला मध्य रेल्वेवरुन दररोज ८ लाख उपनगरीय लोकल प्रवासी प्रवास करत आहेत. परंतु सामान्यांसाठी लोकल अद्यापही खुली नाही. तर महिलांसाठी सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ७ नंतर प्रवास आहे. अशा अनेक अडचणी अन्य प्रवाशांसमोर आहे.

अद्याप लोकल प्रवासाची मुभा नसल्यानं अनेक जण लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवा कर्मचारी असलेले बनावट ओळखपत्रही बनवून घेत आहेत. शुक्रवारी मध्य रेल्वेच्या विविध स्थानकात ५४ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र पकडण्यात आले. सरकारी, पालिका, खासगी रुग्णालय, विविध औषध कंपन्या आणि विमा कंपन्यांचे कर्मचारी म्हणून त्यांनी  ओळखपत्र बनविले होते.

आतापर्यंत मध्य रेल्वेवर ५०० हून अधिक बनावट ओळखपत्रधारकांना पकडण्यात आले आहेत. यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांबरोबरच,मुंबई पालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी व अन्य श्रेणीतील ओळखपत्रांचा समावेश आहे.

अनेक जण सीएसएमटी परिसरातील कार्यालय गाठण्यासाठी लोकलनं सीएसएमटी स्थानकात उतरतात. या स्थानकात गेल्या काही दिवसांपासून सकाळपासून तिकीट तपासणीसांचा फौजफाटाच तैनात असतो. शुक्रवारी  ५३८ विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा