पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ४९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (४ जानेवारी) ४९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३४ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १,  नवीन पनवेल २, खांदा काॅलनी ३, कळंबोली ११, कामोठे १३, खारघर  १७, तळोजा येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ८, नवीन पनवेल १०, कळंबोली १, कामोठे ३, खारघर ११, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७६६० कोरोना रूग्णांपैकी २६७२९ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३२५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात


पुढील बातमी
इतर बातम्या