Advertisement

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
SHARES

नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात मुंबईकरांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे. रविवारी सर्वाधिक कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची (coronavirus patient death) नोंद झाली आहे. मुंबईत फक्त ३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्च २०२० नंतर पहिल्यांदाच दिवसभरात सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ४२ हजार १३६ रुग्ण आहेत. ४९ हजार ६६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारच्या आकडेवारीनुसार दिवसभरात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी फक्त ३ रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईतील मृत्यूचा आकडा कमी झाल्यानं सरकार आणि पालिकेच्या प्रयत्नांना यश मिळाल्याचं दिसतं आहे.

दरम्यान मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. झोपडपट्टयांतील कंटेन्मेंट झोनची आणि सीलबंद इमारतीची संख्येतही घट होत आहे. कोरोनासंदर्भातील शनिवार (२ जानेवारी) आणि आज (३ जानेवारी) अशा दोन दिवसांचा तुलनात्मक अभ्यास केला असता, झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनची संख्या २८३ वरून २२१ एवढी झाली आहे.

झोपडपट्टया आणि चाळीतील कंटेन्मेंट झोनच्या संख्येत ६२ ने घट झाली आहे. तर सीलबंद इमारतीची संख्या २ हजार ४६२ वरून २०९० एवढी झाली आहे. म्हणजेच त्यामध्ये ३७३ नं घट झाली आहे.

देशात दोन कोरोना लशींच्या (Covid-19 Vaccine) आपत्कालीन वापरास (Emergency use) मंजुरी मिळाली आहे. लसीकरणासाठी परळच्या राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय, शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय, मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर धर्मादाय रुग्णालय, विलेपार्ल्याचे डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, सांताक्रूझचे व्ही. एन. देसाई रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय ही ८ लसीकरण केंद्रे नियोजित करण्यात आली आहेत.



हेही वाचा

मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण माहिती

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा