Advertisement

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण माहिती

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. जाणून घ्या ते काय बोलले?

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल राजेश टोपे यांची महत्त्वपूर्ण माहिती
SHARES

देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत ४३ जणांचे सँपल घेण्यात आले आहेत. नव्या कोरोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार अॅलर्ट झालं आहे. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असंही त्यांनी म्हटलं.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा