Advertisement

मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार

सिरम इन्स्टिट्युच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिल्यानंतर मुंबईतील ४ प्रमुख रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबाबत माहिती दिली.

मुंबईतील चार रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होणार
SHARES

सिरम इन्स्टिट्युच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला परवानगी दिल्यानंतर मुंबईतील ४ प्रमुख रुग्णालयांमध्ये लसीकरणाला सुरुवात होणार आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांनी याबाबत माहिती दिली. 

केईएम, सायन, नायर आणि कूपर रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात होणार आहे. संजय ओक यांनी सांगितलं की,   कोरोना लस ही टप्प्याटप्प्यानं दिली जाणार आहे. डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पोलिस यांना पहिल्या टप्प्यात ही लस दिली जाणार आहे. त्यानंतर ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहे त्यांना ही लस दिली जाणार आहे. ५० वर्षे वयाच्या पुढील लोकांना ही लस दिली जाईल.

कोणतीही लस १०० टक्के सुरक्षित नसते. मात्र, जो अभ्यास झाला त्यात या लस सुरक्षित असल्याचं दिसतं. मनपा रुग्णालयांना मेडिकलचा प्रचंड अभ्यास आहे. या पूर्वीही लसीकरणाचे कार्यक्रम राबवण्यात आले आहेत. ज्यांना कोरोना होऊन गेला. ज्यांना झाला नाही. त्या सगळ्यांना या लसीची गरज आहे. ही लस अॅन्टी बॉडिज निर्माण करते, इम्युनिटी वाढवते, असंही ओक यांनी सांगितलं.

अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडच्या कॅडीला लसीला मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या विरोधातील लढ्यात देशाला तिसरं मोठं यश मिळालं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या कोरोनावरील तज्ज्ञ समितीने भारत बायोटेकची  देशी कोविड लस कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्याची शिफारस केली होती. अखेर त्या लसीला मंजुरी देण्यात आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा