Advertisement

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात

पाणीपुरवठा करणाऱ्या २४०० मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर ठाण्यातील आग्रा रोड व्हॉल्व्ह संकुल ते पोगाव दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या (जलशुद्धीकरण यंत्रणा) दुरुस्तीचं काम होणार आहे.

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात
(Representational Image)
SHARES

मुंबईत ५ आणि ६ जानेवारीला १५ टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या २४०० मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीवर ठाण्यातील आग्रा रोड व्हॉल्व्ह संकुल ते पोगाव दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या (जलशुद्धीकरण यंत्रणा) दुरुस्तीचं काम होणार आहे. त्यामुळे ५ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून ६ जानेवारीला सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी ही पाणीकपात असेल.

वांद्रे ते दहिसर आणि कुर्ला ते भांडुप या परिसरात १५ टक्के पाणीकपात होणार आहे. गोवंडी, मानखुर्द, चेंबूर, मुलुंड, परळ-लालबाग, शिवडी, वडाळा-माटुंगा-शीव या भागांमध्ये पाणीकपात नसेल.  मुंबईकरांनी योग्य ती काळजी घेऊन त्यानुसार पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलं आहे. 

या आधीही येवईतील जलशुद्धीकरण यंत्रणेची दुरुस्ती करण्यासाठी मंगळवार २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणीकपात केली होती. तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशयातील कप्पा-१ ला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मि.मी. व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील १४०० मि.मी. व्यासाची झडप बसविण्याचे काम करण्यात आले. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा