राज्यात सोमवारी कोरोनाचे ५२१० नवीन रुग्ण

राज्यात सोमवारी कोरोनाचे ५२१० नवीन रुग्ण आढळले.  तर दिलासादायक बाब म्हणजे ५०३५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सोमवारी १८  रुग्णांचा मृत्यू झाला. 

राज्यात आतापर्यंत एकूण १९ लाख ९९ हजार ९८२ कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत.  रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४.९६ टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर २.४६ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५७ लाख ९३ हजार ४२४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ६ हजार ९४ (१३.३४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख २४ हजार ५४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १८९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५३,११३ आहे. सर्वाधिक ९८७४ अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. नागपूर जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७१६७ तर ठाणे जिल्ह्यात ६१४८ आणि मुंबईत ५९८६ आहे. 

हेही वाचा -

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या