Advertisement

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'

मुंबईतील सील इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत मात्र घट होत होती. मात्र मागील २ दिवसांमध्ये सील इमारतींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.

बापरे! २ दिवसांत मुंबईतील सील इमारतींची संख्या 'इतकी'
SHARES

मागील आठवड्यात मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय, मुंबईतील सील इमारती आणि प्रतिबंधित क्षेत्रांच्या संख्येत मात्र घट होत होती. मात्र मागील २ दिवसांमध्ये सील इमारतींच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. १९ फेब्रुवारी रोजी सील इमारतींची संख्या १३०५ इतकी नोंदविण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मुंबई महापालिकेनं बाधित रुग्ण सापडताच इमारत सील करण्याचा, तसंच परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. 

या नियमात वेळोवेळी बदल करण्यात आले. त्यानुसार १०पेक्षा अधिक रुग्ण सापडल्यानंतर संबंधित इमारत पूर्णपणे सील करण्यात येत होती. मात्र, आता ५ रुग्ण सापडले तरी इमारत कुलुपबंद करण्यात येत आहे. २ रुग्ण सापडल्यानंतर इमारतीचा संबंधित मजला सील करण्यात येत आहेत. त्यामुळं गेल्या २ दिवसांमध्ये सील इमारतींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईत १ फेब्रुवारी रोजी ३२८ जणांना कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यावेळी तब्बल २ हजार २२ इमारती सील करण्यात आल्या होत्या. तर १७ फेब्रुवारी रोजी सील इमारतींची संख्या घसरून ५४५ इतकी झाली होती. बहुतांश इमारतींमध्ये नियोजित मुदतीत नवे रुग्ण न सापडल्यानं त्या र्निबधातून मुक्त करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या २ दिवसांपासून अचानक सील इमारतींच्या संख्येतही वाढ झाली आहे.

महापालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार १९ फेब्रुवारी रोजी सील इमारतींची संख्या १३०५ वर पोहोचली आहे. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील काही कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाबाधित झाल्याचं निदर्शनास आलं आहे. टप्प्याटप्प्यानं लॉकडाऊन शिथिल होताना विवाह सोहळे, कौटुंबिक समारंभांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा