Advertisement

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई

मास्क न लावणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली आहे.

मास्कविना फिरणाऱ्या 'इतक्या' जणांवर कारवाई
SHARES

मास्क न लावणाऱ्यांविरोधात महापालिकेनं कठोर पावलं उचण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी एका दिवसात १६ हजार १५४ जणांकडून प्रत्येकी २०० रुपये यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये दंडवसुली केली. अंधेरी भागात हे प्रमाण अधिक आहे. 

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दर दिवशी २५ हजार जणांवर कारवाई करण्याचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य महापालिकेच्या यंत्रणेला अद्याप गाठता आलेलं नाही. रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर मास्क लावण्याबाबत नागरिक दक्ष नव्हते. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमी वर महापालिकेनं मास्कविना फिरणाऱ्या नागरिकांविरोधात कारवाई कठोर करण्याचं ठरवलं आहे.

त्याकरिता मार्शलची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाई अधिक प्रभावीपणे व व्यापकतेनं करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले होते. त्यानुसार शनिवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. उपाहारगृहे, क्लब, जिमखाना, चित्रपटगृहे, मंगल कार्यालये, उद्याने अशा  सार्वजनिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.

कोरोनाविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला आहे. मास्क न लावणाऱ्या १६ हजार १५४ जणांवर प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण ३२ लाख ३० हजार ८०० रुपये  दंडवसुली करण्यात आली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा