नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ५६ रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (४ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५६ रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ३१६ झाली आहे. 

सोमवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ७, नेरुळ ७, वाशी ८, तुर्भे १३, कोपरखैरणे ५, घणसोली ४, ऐरोली येथील १२  रुग्णांचा समावेश आहे. तर ६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर २५, नेरुळ ९, वाशी ७, तुर्भे ४, कोपरखैरणे ७, घणसोली ६, ऐरोली ६,  दिघा येथील ४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,३४७ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०६० झाला आहे. नवी मुंबईत सध्या ९०९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईत दिवाळीनंतर कोरोना रुग्णांत वाढ झाली होती. त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्णदुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता. मात्र, आता मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधी ६१६ दिवस म्हणजे एक वर्ष सहा महिन्यांपर्यंत गेला आहे.पालिकेने शहरातील सर्व विभागांत उभारलेली १२ काळजी केंद्र टप्प्याटप्प्याने बंद केली आहेत.


हेही वाचा -

दिलासादायक! २०२० नंतर पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

मुंबईत मंगळवारी, बुधवारी १५ टक्के पाणीकपात


पुढील बातमी
इतर बातम्या