पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी ५७ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (६ नोव्हेंबर) ५७ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ९६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये पनवेल, नवीन पनवेल आणि तळोजा येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील १४, नवीन पनवेल ८, खांदा काॅलनी ३, कळंबोली ७, कामोठे ५, खारघर १९, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल २०, कळंबोली ८, कामोठे ३१, खारघर येथील ३२ रुग्णांचा समावेश आहे.  

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३९५७ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२७७३ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५५९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६२५ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत.


हेही वाचा -

दिवाळीची सुट्टी झाली १४ दिवसांची, होणार लगेच लागू

अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं


पुढील बातमी
इतर बातम्या