कल्याण डोंबिवलीत ५९१ नवीन रुग्ण, ९ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे नवीन ५९१ रुग्ण आढळले. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३३,५२० झाली आहे. यामध्ये ४५९५ रुग्ण उपचार घेत असून २८,२१७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ८३, कल्याण प. १७८, डोंबिवली पूर्व १९५, डोंबिवली प १०६, मांडा टिटवाळा  २२, मोहना  ४, तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १२ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.


हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या