मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण

कोरोनाच्या संकटातून मुंबई सावरत असतानाच आता मुंबईवर आणखी एक संकट आलं आहे. कोरोनानंतर आता मुंबईत मलेरियाची साथ पसरू लागली आहे. मुंबईत ऑगस्टमध्ये मलेरियाचे ५९२ रुग्ण सापडले आहेत. तर मलेरियाने दोघांचा मृत्यू झाला आहे.  

कोरोनाशी लढा देत असताना मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला आता पावसाळी आजाराशी सामना करावा लागत आहे. जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पावसाळी आजारांचा प्रभाव जाणवला नाही. मात्र जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळताच पावसाळी आजार डोके वर काढायला लागले. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत मलेरियाचे रुग्ण कमी सापडले आहेत. मुंबईत गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मलेरियाचे ८२४ रुग्ण सापडले होते. तर यंदा ऑगस्टमध्येच ५९२ रुग्ण सापडले आहेत. मात्र मागील वर्षी एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, यंदा ऑगस्टच्या १५ दिवसातच मलेरियाने दोघांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे यंदा रुग्ण कमी असले तरी झालेले मृत्यू ही पालिकेसमोर चिंतेची बाब आहे. मलेरियापाठोपाठ मुंबईत ऑगस्टमध्ये लेप्टोचे १६, गॅस्ट्रोचे २३, हेपेटायटीसचे ५ आणि डेंग्यूचे ६ रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम


पुढील बातमी
इतर बातम्या