नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ६८ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ६८ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ९३५ झाली आहे. 

गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १३, नेरुळ १९, वाशी ९, तुर्भे ३, कोपरखैरणे ५, घणसोली ९, ऐरोलीतील १० रुग्णांचा समावेश आहे. तर ८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १८, नेरुळ १८, वाशी ७, तुर्भे ९, कोपरखैरणे ६, घणसोली १०, ऐरोली १३, दिघातील ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७,८९० झाली आहे. तर मृतांचा आकडा १०२४ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १०२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

मागील काही दिवसांपासून येथील रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल ४५४ दिवसांवर गेला आहे. 

दिवाळीपूर्वी शहरात रुग्ण दुपटीचा कालावधी ११ नोव्हेंबर रोजी ३५२ दिवसावर गेला होता. मात्र दिवाळीनंतर नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती.  त्यामुळे ३५२ दिवसांवर गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत २६५ दिवसांवर आला होता.  मात्र, आता रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटल्याने रुग्ण दुपटीचा कालावधी ४५४ दिवस म्हणजे एक वर्ष तीन महिन्यांपर्यंत गेला आहे.


हेही वाचा -

मिठी नदीच्या साफसफाईसाठी केंद्राकडून एकही दमडी मिळाली नाही, RTI मधून खुलासा

मुंबईच्या गल्लीबोळात राहणार आता पोलिसांच्या तिसऱ्या डोळ्याची नजर


पुढील बातमी
इतर बातम्या